मुंबई -कोल इंडियाचा समभाग 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचला आहे. आज ( 11 ऑगस्ट ) कोल इंडियाच्या समभागांनी 3 टक्कांच्या वाढीसह 52 आठवड्यांच्या उच्चांकावर गेला आहे. 30 जून 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत भक्कम निकालांनी कोल इंडियाच्या समभागांना चालना दिली ( coal india share touched 52 week high ) आहे.
मुंबई शेअर बाजारात कोल इंडियाचा समभाग 226.00 रुपयांच्या वाढीसह उघडला आहे. याच गतीने हा समभाग 226.10 रुपयांच्या वाढीसह 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचला आहे. SNSE मध्ये कोल इंडियाचे समभाग 0.41 टक्क्यांनी घसरून 218.95 रुपयांच्या आसपास दिसत आहे. मात्र, इंट्राडेमध्ये तो 2.84 टक्क्यांनी वधारला.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून 2022) कोल इंडिया लिमिटेडचा एकत्रित निव्वळ नफा 178.31 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीने सांगितले की, जून तिमाहीत तिचा एकत्रित निव्वळ नफा वाढून रु. 8,834.22 कोटी झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 3,174.15 कोटी होता. कोल इंडिया लिमिटेड (CIL) ने बुधवार, 10 ऑगस्ट रोजी त्यांचे जून तिमाही निकाल जाहीर केले.