नवी दिल्ली : नोटाबंदी आणि डिजिटल व्यवहारांमुळे लोकांच्या सवयींमध्ये बदल झाला आहे. लोक आता रोख रकमेऐवजी ऑनलाइन पेमेंट करण्यास प्राधान्य देत आहेत. डिजिटल व्यवहारांमुळे, आता बहुतेक लोक त्यांच्या घरात रोख ठेवण्याच्या सवयीला आळा घालत आहेत. परंतु असे असूनही, अनेक लोक आपत्कालीन वापरासाठी घरी रोख रक्कम ठेवतात. घरी रोख ठेवणाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात का? जरी घरी रोख रक्कम ठेवणे गुन्हा नसले तरी यासाठीही आयकराचे काही नियम आहेत की, तुम्ही घरात किती रोकड ठेवू शकता.
जाहीर करावा लागतो उत्पन्नाचा स्रोत:आयकर कायद्यानुसार घरात रोख रक्कम ठेवण्यावर कोणतेही बंधन नाही. पण आयकर विभागाने छापे टाकल्यास त्या व्यक्तीला उत्पन्नाचा स्रोत जाहीर करावा लागतो. त्या उत्पन्नाशी संबंधित सर्व कागदपत्रे विभागाच्या अधिकाऱ्याला दाखवावी लागतात. विशेषतः जेव्हा मालमत्ता उत्पन्नापेक्षा जास्त असते. जर तुमच्या घरात ठेवलेल्या रकमेची कागदपत्रे तुमच्या मालमत्तेशी जुळत नसतील तर आयकर अधिकारी तुमच्यावर दंड ठोठावू शकतात. तुमच्याकडून वसूल केलेल्या रोख रकमेच्या 137% पर्यंत कर लावला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की, तुमच्याकडे ठेवलेल्या रोख रकमेच्या 37 टक्के रक्कम ही मालमत्तेएव्हडी असेल तर तुम्हाला दंड भरावा लागेल.