हैदराबाद : तरुण आणि वृद्ध व्यापाऱ्यांपासून ते फेरीवाल्यांपर्यंत सर्वच वर्ग आजकाल युपीआयने पेमेंट करत आहेत. आता प्रत्येकजण खिशात नाही तर मोबाईल फोनमध्ये पैसे बाळगत आहे. तुम्ही फक्त कोड स्कॅन करा किंवा तुमचा मोबाइल नंबर टाका आणि एका क्षणात पेमेंट करा. मात्र आता असे करताना सावधानता बाळगा. जर तुम्ही एक छोटीशी जरी चूक केली तर तुम्ही तुमचे कष्टाने कमावलेले पैसे गमावून बसाल. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी हे उपाय करा.
क्युआर स्कॅन केल्यानंतर पुष्टी करा : युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने आता रोख व्यवहार पूर्णपणे डिजिटल झाले आहेत. मात्र जर तुम्ही युपीआय पेमेंट करताना निष्काळजी असाल तर तुम्हाला अनपेक्षित अडचणींना सामोरे जावे लागेल. आपण जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा आपण क्युआर (QR) कोडने पेमेंट करतो. एकदा हे स्कॅन झाल्यानंतर, दुकानदाराला तपशीलांची पुष्टी करण्यास सांगा. पुष्टीकरणानंतर, तुम्ही तुमचे पैसे ट्रान्सफर करायला हवेत.
युपीआय पेमेंटसाठी सहा अंकी पिन वापरा :अधिक सुरक्षेसाठी युपीआय पेमेंट करताना शक्यतो सहा अंकी पिन वापरा. अनेक लोक सहज आठवण रहावा म्हणून चार अंकी पिन वापरतात. अॅप उघडण्यासाठी तुम्हाला एक विशेष पिन तयार करावा लागेल किंवा फिंगरप्रिंट बायोमेट्रिक्स वापरावे लागतील. फसवणूक करणाऱ्यांना तुमची आर्थिक माहिती चोरण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही किती अतिरिक्त काळजी घेत आहात हे खूप महत्त्वाचे आहे.