महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Apply for Student visa : अभ्यासासाठी परदेशात जायचयं ? असा करा व्हिसासाठी अर्ज

Apply for Student visa : तुम्ही भारताचे नागरिक नसल्यास परदेशात शिक्षण घेण्याचे तुमचे स्वप्न साकारण्यासाठी तुम्हाला विद्यार्थी व्हिसा लागतो. भारतीय विद्यार्थी व्हिसासाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला अधिकृतपणे मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत स्वीकारले जाणे आवश्यक आहे. तुमचा अर्ज यशस्वी झाल्यास तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या संपूर्ण कालावधीसाठी व्हिसा दिला जातो. (Student visa latest news)

Apply for Student visa
असा करा व्हिसासाठी अर्ज

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 4:45 PM IST

हैदराबाद: Apply for Student visa : अनेक मुलांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. त्यासाठी ते खूप मेहनतही करतात. परदेशातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासोबतच स्टुडंट व्हिसासाठीही अर्ज करणे आवश्यक आहे. विद्यार्थी व्हिसासाठी प्रत्येक देशाने स्वतःचे खास नियम बनवले आहेत. जर तुम्ही परदेशी विद्यापीठात प्रवेश घेत असाल तर तुमच्याकडे विद्यार्थी व्हिसाची अचूक माहिती असणं आवश्यक आहे. (apply for student visa uk from india)

आवश्यक कागदपत्रे काय आहेत : स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुमच्याकडे चांगल्या विद्यापीठाची ऑफर असणं आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही व्हिसाच्या पुढील प्रक्रियेसाठी जाऊ शकता. विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी प्रत्येक देशाचे नियम वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, भारतीय विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याचा पुरावा द्यावा लागतो. यासाठी विद्यार्थ्यांना TOEFL (Test of English as a Foreign Language) आणि IELTS (International English Language Testing System) सारख्या परीक्षा द्याव्या लागतात. यासोबतच व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी इतरही अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. (Student visa new rules 2023)

प्रवेश मिळाल्याचा पुरावा :पहिला आणि सर्वात महत्त्वाचा डॅाक्यूमेंट म्हणजे तुमच्या कॉलेज किंवा विद्यापीठाचा प्रवेशाचा पुरावा. यासाठी तुमच्याकडे प्रवेशाशी संबंधित ऑफर लेटर असणे आवश्यक आहे. ऑफर स्वीकारल्यानंतर, तुम्ही याबाबत अर्ज करू शकता.

अभ्यासाशी संबंधित कागदपत्रे : तुमच्या शिक्षणाशी संबंधित सर्व नोंदी तुमच्याकडे ठेवाव्यात. उदाहरणार्थ, मागील पदवी, डिप्लोमा, मार्कशीटपासून ते अलीकडील संस्थेच्या प्रमाणपत्राच्या रेकॉर्डपर्यंत ज्यातून तुम्ही उत्तीर्ण झाला आहात.

कामाचा अनुभव : संशोधन आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तुम्हाला त्या विषयाशी संबंधित कामाचा अनुभवही असायला हवा.

पासपोर्टची वैधता :व्हिसासाठी अर्ज करताना, तुमच्या पासपोर्टच्या वैधतेची काळजी घेणे आवश्यक आहे. कार्यक्रम संपेपर्यंत काही देशांना वैध पासपोर्ट आवश्यक असतो. अशा परिस्थितीत, आपला पासपोर्ट अद्यावत करुन घ्यावा.

लेंग्वेज टेस्ट : भारतातून विद्यार्थी व्हिसा मिळविण्यासाठी, TOEFL (Test of English as a Foreign Language) आणि IELTS (International English Language Testing System) सारख्या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तुमचा स्कोअर तुमच्या विद्यापीठाच्या निवडीत मोठी भूमिका बजावेल.

आर्थिकदृष्ट्या मजबूत असणे महत्त्वाचे आहे: विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज करताना, तुमच्याकडे पुरेसा निधी असल्याची खात्री करा. व्हिसा देताना बरेच देश तुमचे मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट विचारतात. परदेशात शिक्षण शुल्क आणि राहण्याचा खर्च भागवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत असणे महत्त्वाचे आहे.

ट्रॅव्हल मेडिकल इंन्शुरन्स :विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज करताना जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यासारख्या देशांतील संस्था बहुतेक संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीसाठी प्रवास विमा मागतात. त्यामुळे तुमच्यासाठी प्रवास विमा असणे महत्त्वाचे आहे. याशिवाय विविध देशांच्या नियमांनुसार काही कायदेशीर कागदपत्रेही आवश्यक असू शकतात.

अर्ज कसा करायचा : यासाठी तुम्हाला स्टुडंट व्हिसाची फी भरावी लागेल. ही फी प्रत्येक देशाची वेगवेगळी असते. तुम्ही त्या देशाच्या दूतावासात जाऊन फीबद्दल माहिती मिळवू शकता. तुम्ही व्हिसा फी ऑनलाइन देखील भरू शकता. तुम्ही फॉर्म भरून फी भरू शकता. यानंतर तुम्ही जवळच्या दूतावासाशी संपर्क साधा. तुमची मुलाखत निश्चित करुन घ्या.

हेही वाचा :

  1. Jio Air Fiber on Ganesh Chaturthi : 'जिओ एअर फायबर'चं गणेश चतुर्थीला लाँचिंग - मुकेश अंबानींची घोषणा
  2. OCCRP Report On Adani : अदानी समूह पुन्हा अडचणीत? विदेशी कंपनीच्या माध्यमातून व्यवहाराचा ओसीसीआरपीचा अहवाल
  3. Rule Change From १st September २०२३ : देशात आजपासून 'हे' मोठे बदल; सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार परिणाम

ABOUT THE AUTHOR

...view details