नवी दिल्ली: अंबुजा सिमेंट ( Ambuja Cements ) आणि ACC चे USD 6.5 बिलियन मध्ये अधिग्रहण पूर्ण केल्यानंतर, अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी म्हणाले की त्यांच्या समूहाची सिमेंट उत्पादन क्षमता दुप्पट करण्याची आणि देशातील सर्वात फायदेशीर उत्पादक बनण्याची योजना आहे. ते म्हणाले की, जोमदार आर्थिक वाढ आणि पायाभूत सुविधांना सरकारच्या प्रोत्साहनामुळे भारतातील सिमेंटची मागणी अनेक पटींनी वाढेल.
त्यामुळे मार्जिनमध्येही लक्षणीय वाढ होणार आहे. अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष ( Adani Group Founder Gautam Adani ) यांनी 17 सप्टेंबर रोजी अधिग्रहण पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात सांगितले की, त्यांचा समूह एकाच वेळी देशातील दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक बनला आहे. अदानी समूहाने गेल्या आठवड्यात या दोन कंपन्यांमधील होल्सीमच्या स्टेकचे अधिग्रहण पूर्ण केले. हा करार चार महिन्यांत पूर्ण झाला.