महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Adani Group Forbes Report: रशियन बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अदानींनी तारण ठेवले 'स्टेक्स'.. किंमत ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

हिंडेनबर्गनंतर आता फोर्ब्सने अदानी समूहाबाबत मोठा खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार, गौतम अदानी यांचा भाऊ विनोद अदानी यांच्याबाबत खुलासा करण्यात आला आहे. अहवालात दावा करण्यात आला आहे की, समूहाने रशियन बँकेकडून कर्ज घेण्यासाठी प्रवर्तकाची हिस्सेदारी गहाण ठेवली आहे.

By

Published : Feb 18, 2023, 3:07 PM IST

Adani vs Hindenburg
रशियन बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अदानींनी तारण ठेवले 'स्टेक्स'.. किंमत ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

नवी दिल्ली:अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गने 24 जानेवारी रोजी अदानी समूहाचा अहवाल जारी केला. तेव्हापासून अदानी समूहाच्या अडचणी सुरू झाल्या. त्या आजतागायत चालू आहेत. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर फोर्ब्स या वृत्तसंस्थेनेही याप्रकरणी अहवाल प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टमध्ये गौतम अदानी यांचा मोठा भाऊ विनोद अदानी यांच्याबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, विनोद अदानी यांनी एका खाजगी कंपनीच्या सिंगापूर युनिटमधून रशियन बँकेकडून कर्ज घेण्यासाठी $240 दशलक्ष अदानी प्रमोटर स्टेक गहाण ठेवला आहे. विनोद अदानी या सिंगापूर कंपनीचे युनिट चालवतात. विशेष म्हणजे, हिंडेनबर्गनेही फोर्ब्सचा हा अहवाल रिट्विट केला आहे.

करार कसा झाला: 2020 मध्ये, Pinnacle Trade and Investment Pte.Lte ही सिंगापूरची कंपनी अप्रत्यक्षपणे विनोद अदानीद्वारे नियंत्रित होती. रशियन स्टेट बँक VTB सह कंपनीने कर्ज करार केला होता. ज्याला गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिकेनेही मान्यता दिली होती. यानंतर, 2021 मध्ये, पिनॅकल कंपनीने $263 दशलक्ष कर्ज घेतले आणि अज्ञात संबंधित पक्षाला $258 दशलक्ष कर्ज दिले. फोर्ब्सच्या अहवालात असेही म्हटले आहे की, 2021 नंतर, पिनॅकलने कर्जासाठी गॅरेंटर म्हणून दोन गुंतवणूक फंड - Afro Asia Trade & Investment Limited आणि Worldwide Emerging Markets Holding Limited सादर केले. हे दोन्ही फंड अदानी समूहाचे प्रमुख भागधारक आहेत.

विनोद अदानींवर आरोप:विनोद अदानी जे अध्यक्ष म्हणून कमी आणि गौतम अदानी यांचे मोठे भाऊ म्हणून ओळखले जातात. हिंडेनबर्ग अहवालात त्यांच्या नावाचा 151 वेळा उल्लेख करण्यात आला आहे. हा उल्लेख इतर कोणापेक्षाही जास्त आहे. कारण विनोद अदानी ऑफशोअर शेल कंपन्यांमध्ये व्यवस्थापनाचे काम करतात. जे या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते. ते दुबईत राहतात आणि तेथून सिंगापूर आणि जकार्ताचा व्यवसाय सांभाळतात. विशेष म्हणजे, २०१६ साली झालेल्या पनामा पेपर्स लीक आणि २०२१ साली झालेल्या पंडोरा पेपर्स प्रकरणात विनोद अदानी यांचे नावही आले होते. हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार, ते जगातील सर्वात श्रीमंत अनिवासी भारतीय (NRI) आहेत.

अहवालाचा प्रभाव: हिंडेनबर्ग अहवालाने गौतम अदानी, त्यांचे कौटुंबिक साम्राज्य आणि भारतीय व्यवसाय आणि राजकीय जीवन व्यापले आहे. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतरच गौतम अदानींचा त्रास सुरू झाला, जो आजही कायम आहे. या अहवालामुळे अदानी समूहाचे मार्केट कॅप निम्म्यावर आले आहे. फोर्ब्स अब्जाधीशच्या अहवालानुसार त्यांची एकूण संपत्ती ५१.१ अब्ज डॉलरवर आली आहे. यासह, ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 24 व्या स्थानावर घसरले आहेत. मात्र, अदानी समूहाने हिंडेनबर्गचा अहवाल बिनबुडाचा असल्याचे म्हटले असून, त्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असल्याचेही सांगितले आहे.

हेही वाचा: Twitter Offices Closed In India : एलन मस्कने भारतातील तीनपैकी दोन ट्विटरचे कार्यालय गुंडाळले, जाणून घ्या काय आहे कारण

ABOUT THE AUTHOR

...view details