नवी दिल्ली -आर्थिक संकटात असलेल्यायेस बँकेचे शेअर सर्वाधिक १० टक्क्यांनी वाढले आहेत. ब्रिकवर्क या पतमानांकन संस्थेने येस बँकेच्या मानांकनात सुधारणा केली आहे. त्यामुळे येस बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे.
ब्रिकवर्क या पतमानांकन संस्थेने येस बँकेचे मानांकन 'बेसल ०२' वरून 'बेसल बीबी प्ल' अथवा 'स्थिर' केले आहे. त्यामुळे येस बँकेच्या शेअरची गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. मुंबई शेअर बाजारातयेस बँकेचे शेअर ९.९८ टक्क्यांनी वाढून अप्पर सर्किट १९.०६ रुपयावर पोहोचले.
हेही वाचा-मुंबई शेअर बाजाराचा नवा ऐतिहासिक उच्चांक; ४९५ अंशाने वधारून ओलांडला ४६,००० चा टप्पा