टेक डेस्क - चीनची स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनीXiaomi चा सब ब्रांड Poco F1 भारतीय युजर्समध्ये प्रंचड लोकप्रिय ठरला आहे. स्मार्टफोन युजर्सनी या फोनला पहिली पसंती दिली आहे. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्याIDCच्या अहवालात १५ हजार रुपयांपेक्षा महाग असलेल्या स्मार्टफोन्सच्या यादीतPoco F1 ने OnePlus 6 ला धोबीपछाड दिला आहे.
Xiaomi India चे प्रमुख मनु कुमार जैन यांनी यासंबंधी ट्विट करत माहिती दिली आहे. मनु कुमार जैन यांनी ट्विटमध्ये OnePlus च्या टॅगलाईन (नेव्हर सेटल्ड) वरही निशाणा साधला आहे. नाऊ इट्स सेटल्ड असा टोमणा त्यांनी OnePlus ला मारला आहे. मनु जैन यांनी ट्विटसह एक फोटो पण पोस्ट केला आहे. यामध्ये OnePlus 6 आणि Poco F1 चे छायाचित्र दिसत आहे.IDCचा डेटा यामध्ये दाखवण्यात आला आहे. ज्यामध्येOnePlus चे मार्केट शेअर 17.9 टक्के दाखवण्यात आले आहेत तर Poco F1 चे मार्केट शेअर २२.५ टक्के दाखवण्यात आले आहे.
सध्या भारतीय बाजारात स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट प्रोसेसरसह मिळणाऱ्या स्मार्टफोन्समध्येPoco F1 ची किंमत सर्वात कमी आहे. हे प्रोसेसर फ्लॅगशिप स्मार्टफोन्ससाठी गेल्यावर्षी सादर करण्यात आले होते.
Poco F1 चे फिचर्स
- 6.18 इंचीचा फुल एचडी डिस्प्ले नॉच फीचर