लंडन - कोरोनाचा सर्वच क्षेत्रावर नकारात्मक परिणाम झाला असताना खनिज तेलाची किमती कमालीच्या घसरल्या आहेत. वेस्ट टेक्सास इंटरमिडियट (डब्ल्यूटीआय) हा जागतिक तेलाच्या किमतीचा निर्देशांक आहे. या बाजारपेठेत खनिज तेलाची किंमत घसरून प्रति बॅरल केवळ १९.२० डॉलर झाली आहे.
कोरोना महामारीने जगभरातील देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे खनिज तेलाची जागतिक बाजारपेठेतील मागणी कमी झाली आहे. खनिज तेलाची मागणी प्रति दिन ९.३ दशलक्ष बॅरलने कमी झाली आहे. यापूर्वी १९९५ मध्ये प्रतिदिन २९ दशलक्ष बॅरल खनिज तेलाची मागणी कमी झाली होती, असे आंतरराष्ट्रीय उर्जा संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.