महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 15, 2021, 8:43 PM IST

ETV Bharat / business

घाऊक बाजारपेठेत २.०३ टक्क्यांनी वाढली महागाई

घाऊक महागाईचे प्रमाण डिसेंबर २०२० मध्ये १.२२ टक्के होते. तर मागील वर्षात जानेवारीमध्ये घाऊक महागाईचे प्रमाण हे ३.५२ टक्के होते.

घाऊक किंमत निर्देशांक
घाऊक किंमत निर्देशांक

नवी दिल्ली -घाऊक किमतीवर आधारित महागाईचे प्रमाण जानेवारीमध्ये वाढून २.०३ टक्के आहे. अन्नाच्या वर्गवारीतील अन्नाच्या किमती उतरूनही जानेवारीत महागाईमध्ये घसरण झालेली नाही.

घाऊक महागाईचे प्रमाण डिसेंबर २०२० मध्ये १.२२ टक्के होते. तर मागील वर्षात जानेवारीमध्ये घाऊक महागाईचे प्रमाण हे ३.५२ टक्के होते. जानेवारीत अन्नाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण कमी झाले आहे.

हेही वाचा-महागाईत आणखी भडका: घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयाने वाढ

  • उत्पादित वस्तुंच्या किमतीमध्ये घसरण झाल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.
  • अन्नाच्या वर्गवारीत जानेवारीत महागाईचे प्रमाण २.८ टक्क्यांनी घसरले आहे. तर डिसेंबरमध्ये अन्नाच्या वर्गवारीत डिसेंबरमध्ये महागाईचे प्रमाण १.१ टक्क्यांनी घसरले होते.
  • पालेभाज्यांमधील महागाईचे प्रमाण २०.८२ टक्क्यांनी तर बटाट्यांमधील महागाईचे प्रमाण हे २२.०४ टक्क्यांनी जानेवारीत घसरले आहे. तर इंधन आणि उर्जा क्षेत्राच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण हे ४.७८ टक्क्यांनी घसरले आहे.
  • बिगर अन्नाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण वाढून ४.१६ टक्के आहे.
  • ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ बाजारपेठेतील महागाईचे प्रमाण जानेवारीत ४.०६ टक्के राहिल्याची माहिती आकडेवारीतून समोर आली आहे.

हेही वाचा-ऐतिहासिक! शेअर बाजाराने दिवसाखेर ओलांडला ५२ हजारांचा टप्पा

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने ५ फेब्रुवारीच्या पतधोरणात सलग चौथ्यांदा रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details