महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

घाऊक बाजारपेठेत महागाईत 0.58 टक्क्यांची घसरण - food prices spike in July

मासिक घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित वार्षिक महागाईचा दर हा जुलै 2020 मध्ये उणे 0.57 टक्के राहिला आहे. तर मागील वर्षात जुलैमध्ये घाऊक किंमत निर्देशांक हा 1.17 टक्के होता, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Aug 14, 2020, 4:02 PM IST

नवी दिल्ली– घाऊक बाजारपेठेत महागाईचे प्रमाण जुलैमध्ये घसरून 0.58 टक्के झाले आहे. तर अन्नाच्या वर्गवारीत महागाईचे प्रमाण वाढले आहे.

मासिक घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित वार्षिक महागाईचा दर हा जुलै 2020 मध्ये उणे 0.57 टक्के राहिला आहे. तर मागील वर्षात जुलैमध्ये घाऊक किंमत निर्देशांक हा 1.17 टक्के होता, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे. घाऊक बाजारपेठेत महागाईचे प्रमाण जूनमध्ये उणे 1.81 टक्के झाले होते. तर मे महिन्यात महागाईचे प्रमाण हे 3.37 टक्क्यांनी तर एप्रिलमध्ये 1.57 टक्क्यांनी घसरले होते.

  • अन्नाच्या वर्गवारीत जुलैमध्ये घाऊक बाजारपेठेत 4.08 टक्के महागाईचे प्रमाण होते. तर जूनमध्ये घाऊक बाजारपेठेत 2.04 टक्के महागाईचे प्रमाण होते.
  • असे असले तरी इंधन आणि उर्जा वर्गवारीत महागाई घसरून जुलैमध्ये 9.4 टक्के प्रमाण राहिले. तर गतवर्षी जुलैमध्ये इंधन आणि उर्जा वर्गवारीत महागाईचे प्रमाण हे 13.60 टक्के प्रमाण होते.
  • उत्पादित वस्तुंमध्ये जुलैमध्ये महागाईचे प्रमाण वाढून 0.51 टक्के राहिले. तर जूनमध्ये उत्पादित वस्तुंमध्ये महागाईचे प्रमाण हे 0.08 टक्के होते.

भारती रिझर्व्ह बँकेने मागील पतधोरणात रेपो दर हा जैसे थे ठेवला होता. किरकोळ बाजारपेठेत ऑक्टोबर ते मार्चमध्ये महागाई वाढणार असल्याचा अंदाज आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला होता. किरकोळ बाजारपेठेत जुलैमध्ये महागाईचे प्रमाण 6.93 टक्के प्रमाण होते. तर जूनमध्ये किरकोळ बाजारपेठेत 6.23 टक्के महागाईचे प्रमाण होते.

ABOUT THE AUTHOR

...view details