नवी दिल्ली- घाऊक बाजारपेठेतील महागाईने गेल्या आठ महिन्यातील उच्चांक गाठला आहे. ऑक्टोबरमध्ये घाऊक बाजारपेठेत १.४८ टक्के महागाईची नोंद आहे. कारखान्यातील उत्पादनांची किंमत वाढल्याने घाऊक बाजारपेठेत महागाई वाढली आहे.
सप्टेंबरमध्ये घाऊक बाजारपेठेत १.३२ टक्के महागाईची नोंद होती. तर गतवर्षी ऑक्टोबरमध्ये घाऊक बाजारपेठेत शून्य टक्के महागाई होती. घाऊक बाजारपेठेत महागाई फेब्रुवारीत २.२६ टक्के होती. त्यानंतर आठ महिन्यांनी पहिल्यांदाच घाऊक बाजारपेठेत महागाईने उच्चांक गाठला आहे. ऑक्टोबरमध्ये घाऊक बाजारपेठेत अन्नाच्या वर्गवारीत उत्पादनांच्या किमती कमी झाल्या आहेत. तर उत्पादनांच्या किमती वाढल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.