टोकियो– जगभरातील देशांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. याचवेळी जगभरातील देशांच्या शेअर बाजारात घसरण झाली आहे. महामारी आणखी वाईट होईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विधान केले होते. त्यानंतर अमेरिकेच्या फ्युचर शेअरमध्ये घसरण झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढताना जगभरातील देशांचे शेअर बाजार घसरणीला - Brent crude oil
अमेरिकेच्या एस अँड पीमध्ये 0.2 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर डाऊ या उद्योगांच्या फ्युचरमध्ये 0.1 टक्क्यांची घसरण झाली आहे.

अमेरिकेच्या एस अँड पीमध्ये 0.2 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर डाऊ या उद्योगांच्या फ्युचरमध्ये 0.1 टक्क्यांची घसरण झाली आहे. जर्मिनीच्या डीएएक्समध्ये 0.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. हाँगकाँगच्या हँग सेंग शेअर बाजाराचा निर्देशांक 2 टक्क्यांनी घसरून 25,131.50 वर स्थिरावला. हाँगकाँगच्या आरोग्य मंत्र्यांनी समूह संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली आहे. हाँगकाँगमध्ये 2 हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ऑस्ट्रिलियामध्ये एस अँड पी एएसएक्स/200 हा शेअर बाजार 1.3 टक्क्यांनी घसरून 6,075.10 वर स्थिरावला.
टोकियोच्या निक्केईचा 225 निर्देशांक 0.6 टक्क्यांनी घसरून 22,751.61 वर स्थिरावला. जगभरातील शेअर बाजार घसरण होत असताना शांघायचा निर्देशांक 0.2 टक्क्यांनी वधारून 3,328.68 वर पोहोचला. मायक्रोसॉफ्ट, टेस्ला आदी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी वित्तीय कामगिरीची नुकेतच आकडेवारी जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर 31 सेंटने घसरून प्रति बॅरल 44.01 डॉलर झाले आहेत.