नवी दिल्ली- किरकोळ बाजारपेठेबरोबर घाऊक बाजारपेठेतील महागाई डिसेंबरमध्ये भडकल्याचे दिसून आले आहे. डिसेंबरमध्ये घाऊक बाजारपेठेतील महागाईची२.५९ टक्के नोंद झाली आहे. तर नोव्हेंबरमध्ये घाऊक बाजारपेठेतील महागाई ही ०.५८ टक्के होती.
डिसेंबर २०१८ मध्ये घाऊक बाजारपेठेत ३.४६ टक्के महागाईची नोंद झाली होती. डिसेंबर २०१९ मध्ये अन्नाच्या वर्गवारीत १३.१२ टक्के महागाईची वाढ झाली आहे. तर नोव्हेंबरमध्ये अन्नाच्या वर्गवारीत ११ टक्के महागाई वाढली होती. तर बिगर अन्नाच्या वर्गवारीत डिसेंबरमध्ये ७.७२ टक्के महागाईची नोंद झाली आहे. तर बिगर अन्नाच्या वर्गवारीत डिसेंबरमध्ये १.९३ टक्के महागाईची नोंद झाली होती. ही आकडेवारी केंद्रीय वाणिज्य मंत्रालय आणि उद्योगाने जाहीर केली आहे.