नवी दिल्ली - कोरोनाचा देशात प्रसार वाढत असलातना काही वस्तुंच्या विक्रीत वाढ झाल्याचे वॉलमार्ट इंडियाने म्हटले आहे. वैयक्तिक काळजी आणि स्वच्छतेच्या वस्तू विक्री करताना त्याच्या प्रमाणात मर्यादा घातल्याचे कंपनीने म्हटले आहे.
वॉलमार्ट इंडिया ही देशात 'बिझनेस टू बिझनेस'मध्ये विक्री करते. कंपनीने हात धुण्याच्या सॅनिटायझेवरच्या विक्रीवर मर्यादा घातली आहे. वॉलमार्ट इंडियाच्या प्रवक्त्याने म्हटले, की कंपनी सतत पुरवठादार भागीदारांच्या संपर्कात आहे. त्यामधून आम्ही वस्तुंचा साठा आमच्या उत्कृष्ट किंमतीत मिळेल, असा प्रयत्न करत आहोत. प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या विक्रीतही वाढ झाली आहे.
हेही वाचा -शेअर बाजाराची घसरगुंडी थांबेना; सेन्सेक्स ३८ महिन्यांच्या निचांकी पातळीवर