महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

व्होडाफोन आयडियासह भारती एअरटेलचे ३० टक्क्यापर्यंत वधारले शेअर - telecom sector

मुंबई शेअर बाजारात व्होडाफोन आयडियाचे शेअर २९.७५ टक्क्यांनी वधारून प्रति शेअर ५ रुपये ८० पैसे झाले आहेत. तर भारती एअरटेलचे शेअर ६.३१ टक्क्यांनी वधारून ४३५ रुपये झाले आहेत.

संग्रहित - व्होडाफोन आयडिया

By

Published : Nov 19, 2019, 2:03 PM IST

नवी दिल्ली - मुंबई शेअर बाजारात व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलचे शेअर ३० टक्क्यापर्यंत वधारले. दोन्ही कंपन्यांनी फोन कॉल आणि डाटाचे दर १ डिसेंबरपासून वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर गुंतणूकदारांनी दूरसंचार कंपन्यांच्या शेअरची खरेदी केली.

मुंबई शेअर बाजारात व्होडाफोन आयडियाचे शेअर २९.७५ टक्क्यांनी वधारून प्रति शेअर ५ रुपये ८० पैसे झाले आहेत. तर भारती एअरटेलचे शेअर ६.३१ टक्क्यांनी वधारून ४३५ रुपये झाले आहेत. भारती एअरटेलच्या शेअरची किंमत गेल्या ५२ आठवड्यातील सर्वाधिक आहे.

हेही वाचा-सरकारी बँकेतील ठेवींवरील विमा संरक्षण काढा; बँक कर्मचारी संघटनेची मागणी

तीव्र स्पर्धा आणि केंद्रीय दूरसंचार विभागाला द्यावे लागणारे कोट्यवधी रुपये या कारणांनी एअरटेलसह व्होडाफोन आयडिया कंपनी अडचणीत आहे. व्यवसायात टिकून राहण्यासाठी व्होडाफोन आयडियाने रिचार्जचे दर डिसेंबरपासून वाढविण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन वर्षात प्रथमच व्होडाफोन आयडियाने दर वाढविणार असल्याचे जाहीर केले. तर व्होडाफोन आयडियापाठोपाठ एअरटेलही रिचार्जचे दर वाढविणार आहे. दोन्ही कंपन्यांनी किती दर वाढविणार आहे, हे अद्याप जाहीर केलेले नाही.

हेही वाचा-व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज १ डिसेंबरपासून महागणार

दूरसंचार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज लागते. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे सतत गुंतवणूकीची गरज असते, असे भारती एअरटेलने म्हटले आहे. डिजीटल इंडियाला मदत करण्यासाठी दूरसंचार उद्योगाने यशस्वीपणे काम करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे एअरटेलने पुढील महिन्यापासून दर वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे भारती एअरटेलने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details