महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'या' प्रॅन्कला बळी पडू नका, ब्लॉक होणार ट्विटर अकाउंट

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर एक प्रॅन्क झपाट्याने व्हायरल होत आहे. यामध्ये युजर्सला अकाउंटमध्ये जन्मतारीख बदलण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रॅन्कमध्ये सांगण्यात येत आहे, की युजर्सनी आपली जन्मतारीख बदलून २००७ करावी. दावा करण्यात येत आहे, की असे केल्याने ट्विटरचे फिड रंगीत होणार.

'या' प्रॅन्कला बळी पडू नका, ब्लॉक होणार ट्विटर अकाउंट

By

Published : Mar 27, 2019, 11:00 PM IST

टेक डेस्क - मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर एक प्रॅन्क झपाट्याने व्हायरल होत आहे. यामध्ये युजर्सला अकाउंटमध्ये जन्मतारीख बदलण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रॅन्कमध्ये सांगण्यात येत आहे, की युजर्सनी आपली जन्मतारीख बदलून २००७ करावी. दावा करण्यात येत आहे, की असे केल्याने ट्विटरचे फिड रंगीत होणार.



ट्विटरने मात्र युजर्सला यासंबंधी सावध राहाण्याचे आवाहन केले आहे. प्रॅन्कला बळी पडू नका, अन्यथा अकाउंट ब्लॉक करण्यात येईल, असे ट्विटरकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात ट्विटरवर १३ वर्षाहून कमी वयाची मुले-मुली अकाउंट ओपन करू शकत नाहीत. अशात जर जन्मतारीख बदलून २००७ केली तर युजर्सचे वय ट्विटरवर १३ वर्षाहून कमी दिसणार. त्यामुळे ट्विटरच्या धोरणानुसार अकाउंट ब्लॉक करण्यात येणार.

उल्लेखनीय म्हणजे अनेक युजर्स या प्रॅन्कला बळी पडले आहेत. या ट्विटसह मिळते-जुळते एक ट्विट १९ हजार हून अधिक वेळा रिट्विट करण्यात आले असल्याचे समजते. या प्रॅन्कला युजर्स बळी पडू नये म्हणून ट्विटर सपोर्टने एक ट्विट प्रसिद्ध केले आहे ज्यामध्ये अशाप्रकारचा ट्विटला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details