महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

एकदा चार्जिंग करून ७५ किमी अंतर चालवा; टीव्हीएसची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच - TVS iQube Electric

इलेक्ट्रिक स्कूटरचे लाँचिंग कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.  ही इलेक्ट्रिक स्कूटर पहिल्यांदा बंगळुरूमध्ये उपलब्ध केली जाणार आहे.

TVS Motor company
टीव्हीएस मोटर कंपनी

By

Published : Jan 25, 2020, 7:09 PM IST

बंगळुरु- टीव्हीएस मोटर कंपनीने आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच केली आहे. या स्कूटरची भारतात १.१५ लाख रुपये (ऑन रोड बंगळुरु) किंमत आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरचे लाँचिंग कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ही इलेक्ट्रिक स्कूटर पहिल्यांदा बंगळुरुमध्ये उपलब्ध केली जाणार आहे. त्यानंतर हे मॉडेल इतर शहरामध्ये विकण्यात येणार आहे. कंपनीची दर महिन्याला १ हजार वाहनांचे उत्पादन घेण्याची क्षमता आहे.

हेही वाचा-आयसीआयसीआय बँकेने तिसऱ्या तिमाहीत मिळवला दुप्पट नफा

ऑटो एक्सो २०१२ मध्ये पहिल्यांदा ई-स्कूटरची संकल्पना मांडण्यात आली होती. टीव्हीएस आयक्यूबही स्मार्टएक्सकनेक्ट, एलईडी डीआरएलशी एलईडी हेडलँपने जोडण्यात आलेली आहे. स्कूटरला इलेक्ट्रिक मोटर आहे. त्यामध्ये ६ बीएचपी आणि १४० एनएमची टॉक्यू क्षमता आहे. तर ७८ किमी प्रति तास या सर्वोत्तम वेगाने धावू शकते.

हेही वाचा-सरकारी बँकांचे पुनर्भांडवलीकरण; अर्थसंकल्पात 'या' तरतुदीची शक्यता

ग्रीन आणि कनेक्टेड आणि देशातील तरुणांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे टीव्हीएस मोटर कंपनीचे चेअरमन वेणू श्रीनावसन यांनी सांगितले. एकदा चार्जिंग केल्यानंतर स्कूटर ७५ किमी जावू शकते. स्कूटरमध्ये ४.५ केडब्ल्यूएच लिथियम आयओएन बॅटरी आहे. ही बॅटरी ५ तासात चार्ज होते. एवढी वेगाने कोणतीही बॅटरी चार्जिंग होत नसल्याचा कंपनीने दावा केला.

ABOUT THE AUTHOR

...view details