महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

एलईडी टीव्हीच्या एप्रिलमध्ये वाढणार किमती - TV manufacturing in India

पॅनासोनिक, हेयर आणि थॉमसनकडूनही एलईडी टीव्हीच्या किमती एप्रिलपासून वाढविण्यावर विचार सुरू आहे. तर एलजीने यापूर्वीच टीव्हीच्या किमती वाढविल्या आहेत.

TV prices
टीव्ही प्राईजेस

By

Published : Mar 11, 2021, 5:10 PM IST

नवी दिल्ली- एलईडी टीव्हीच्या किमती एप्रिलमध्ये वाढणार आहेत. ओपन सेल पॅनलच्या किमती महिनाभरात जागतिक बाजारात ३५ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना एलईडी टीव्ही खरेदीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

पॅनासॉनिक, हेयर आणि थॉमसनकडूनही एलईडी टीव्हीच्या किमती एप्रिलपासून वाढविण्यावर विचार सुरू आहे. तर एलजीने यापूर्वीच टीव्हीच्या किमती वाढविल्या आहेत. पॅनासोनिक इंडिया, दक्षिण आशियाचे अध्यक्ष तथा सीईओ मनिष शर्मा म्हणाले की, पॅनेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे टीव्हीच्या किमतीही वाढत आहेत. टीव्हीच्या किमती एप्रिलपासून वाढण्याची शक्यता आहे. हे दरवाढीचे प्रमाण ५ ते ७ टक्के असणार आहे.

हेही वाचा-आत्मनिर्भर भारत: आयफोन १२ चे देशात घेण्यात येणार उत्पादन

हेयर अप्लायन्सेस इंडियाचे अध्यक्ष एरिक ब्रॅगान्झा म्हणाले की, किमती वाढविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ओपन सेलच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. यामध्ये आणखी वाढ सुरुच राहणार आहे. जर अशीच स्थितीत राहिली तर आम्ही पुन्हा किमती वाढूवू शकतो असेही ब्रॅगान्झा यांनी सांगितले.

हेही वाचा-निवडणुकीच्या बिगुलाने इंधन दरवाढ 'थंड'; काही काळ ग्राहकांना दिलासा मिळणार

काय आहे टीव्ही ओपन सेल पॅनेल ?

टीव्हीच्या उत्पादनात ओपन सेल पॅनेल हा महत्त्वाचा घटक आहे. हा टीव्हीमधील ६० टक्के भाग आहे. कंपन्यांकडून ओपन सेल स्टेटची आयात करण्यात येते. त्यामध्ये मूल्यवर्धित असेंम्बलींग करून टीव्हीची विक्री केली जाते.

हेही वाचा-आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल प्रति बॅरल ७० डॉलर; देशात इंधनाचे दर 'जैसे थे'

केंद्र सरकारने सप्टेंबर २०१९ मध्ये खुल्या सेल टीव्ही पॅनेलवरील आयात शुल्कात ५ टक्के कपात केली होती. देशातील उत्पादनाला चालना मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details