मुंबई- रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी आणि इन्फोसिससारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आल्यामुळे गुरुवारी शेअर मार्केटच्या सुरुवातीच्या व्यापारात प्रमुख शेअर निर्देशांक सेन्सेक्स 350 अंकांनी वधारला. या काळात बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक 1361.24 अंक किंवा 0.70 टक्क्यांनी वधारून 52210.72 वर, तर एनएसईचा निफ्टी 100.25 अंक किंवा 0.64 टक्क्यांनी वधारला आणि 15,676.45 वर पोहोचला आहे.
टायटन सर्वाधिक चार टक्के तेजीत
सेन्सेक्समध्ये टायटन हा सर्वाधिक चार टक्के तेजीत होता. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज, पॉवरग्रीड, कोटक बँक, एचडीएफसी, ओएनजीसी आणि इन्फोसिस या कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर दुसरीकडे, एनटीपीसी, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया, डॉ. रेड्डीज, एसबीआय आणि सन फार्मा ह्या कंपन्याचे शेअर्स लाल निशाणावर आहे. मागील सत्रात सेन्सेक्स 85.40 अंक किंवा 0.16 टक्क्यांनी घसरून 51,849.48 वर बंद झाला. तर निफ्टी 1.35 अंकांनी किंवा 0.01 टक्क्यांनी वधारून 15,576.20 वर बंद झाला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेलाचा बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.62 टक्क्यांनी वाढून 71.79 डॉलर प्रति बॅरलवर होता.
हेही वाचा -विजय मल्ल्याची 5600 कोटीची मालमत्ता होणार जप्त; कारवाईला न्यायालयाकडून हिरवा कंदील