हैदराबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने आज १ लाख ४५ हजार कोटींची कॉर्पोरेट सवलत जाहीर केली आहे. या निर्णयाने शेअर बाजाराचा निर्देशांक १८०० अंशाने वधारल्याने कंपन्यांचा चांगला फायदा झाला आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांच्या भांडवली मूल्यात ७ लाख कोटींची भर पडली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट दरात कपात, सीएसआर खर्चाच शिथीलता असे निर्णय घेतले. या निर्णयाला संसदेची मंजुरी लागत असते. सरकारने अधिसूचना काढून कायद्यात बदल करून कर सवलत जाहीर केली आहे. शेअर बाजारामध्ये सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ६ लाख ८२ हजार ९३८.६ कोटींवरून १ कोटी ४५ लाख ३७ हजार ३७८.०१ रुपये झाले.
हेही वाचा-शेअर बाजारासह निफ्टीने गेल्या दहा वर्षाचा 'हा' मोडला विक्रम
देशातील कंपन्यांचा कॉर्पोरेट कर हा २२ टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे. तर नव्या कंपन्यांना १५ टक्के कर लागू होणार आहे. तर कंपन्यांना सीएसआर हा सरकारी संस्था, विद्यापीठ व आयआटीसारख्या संस्थांसाठी खर्च करता येणार आहे.