महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सलग चौथ्या सत्रात शेअर बाजाराचा वधारला निर्देशांक; गाठला नवा उच्चांक - NIFTY update news

मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीचा निर्देशांक १२३.९५ अंशाने वधारून १३,८७३.२० वर स्थिरावला. जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार

By

Published : Dec 28, 2020, 5:42 PM IST

मुंबई- शेअर बाजाराचा निर्देशांक सलग चौथ्या सत्रात घसरण वधारला आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३८०.२१ अंशाने वधारून ४७,३५३.७५ वर स्थिरावला. शेअर बाजाराने दिवसभरात ४७,४०६.७२ चा उच्चांक गाठला होता. मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीचा निर्देशांक १२३.९५ अंशाने वधारून १३,८७३.२० वर स्थिरावला.

हेही वाचा-टिप्स इंडस्ट्रीजचे संगीत व व्हिडिओ फेसबुकसह इन्स्टाग्रामवर वापरता येणार; दोन्ही कंपन्यांमध्ये करार

या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर

टायटन, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक आणि एशियन पेंट्सचे शेअर वधारले. एचयूएल, सन फार्म, डॉ. रेड्डी, बजाज फिन्सर्व्हचे शेअर घसरले. मागील सत्रात गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५२९.३६ अंशाने वधारून ४६,९७३.५४ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १४८.१५ अंशाने वधारून १३,७४९.२५ वर स्थिरावला. नाताळ सणामुळे शुक्रवारी शेअर बाजार बंद राहिला होता.

हेही वाचा-year Ender 2020: उद्योगजगताच्या वर्षभरातील ठळक घडामोडींचा मागोवा

अमेरिकेन सरकारने कोरोनाच्या काळात दिलासा देण्यासाठी २.३ अब्ज डॉलरचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १.२५ टक्क्यांनी वाढून ५१.९४ डॉलर राहिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details