मुंबई - दिवाळीनंतर शेअर बाजार तेजीत असल्याचा पहायला मिळत आहे. सेन्सेक्स 44,000 च्या पार गेला आहे, निफ्टीनेही 90 अंकांची उसळी घेतली असून, निफ्टी 12,870 पर्यंत पोहचली आहे. काल, अमेरिकन बाजारपेठ देखील दिवसाच्या उच्चांकी पातळीवर बंद झाली. फार्म कंपनी मॉडर्नाने कोरोना लसीची घोषणा केल्यानंतर जगभरातील शेअर बाजारात तेजी असल्याचे पाहायला मिळत आहे.
दिवाळीनंतर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 44 हजारांच्या पार
दिवाळीनंतर शेअर बाजार तेजीत असल्याचा पहायला मिळत आहे. सेन्सेक्स 44000 च्या पार गेला आहे, निफ्टीनेही 90 अंकांची उसळी घेतली असून, निफ्टी 12870 पर्यंत पोहचली आहे.
दिवाळीनंतर शेअर बाजारात तेजी
भारतीय बाजारपेठेतील सेक्टरल इंडेक्सबद्दल बोलायचे झाल्यास बँक, वाहन, धातूंच्या समभागांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. निफ्टी बँक 1 टक्क्यांहून अधिक वाढून 28,900 च्या वर व्यापार करत आहे. वाहन निर्देशांकातही अर्ध्या टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. सध्या निफ्टीमध्ये 34 समभागांची विक्री होत असून, उर्वरित 16 समभाग लाल गुणांसह व्यापार करत आहेत. सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 20 समभाग तेजीत आहेत, तर 10 समभाग लाल गुणांसह व्यापार करत आहेत.