नवी दिल्ली - केंद्र सरकारने १२ हजार टन कांद्याची आयात केली आहे. हा कांदा राज्य सरकारांना ४९ ते ५८ रुपये प्रति किलो दराने वितरित केला जात असल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.
रामविलास पासवान म्हणाले, आम्ही तुर्की आणि अफगाणिस्तानमधून १२ हजार टन कांद्याची आयात केली आहे. यापैकी १ हजार टन कांदा दिल्ली, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि केरळ या राज्यांना वितरित करण्यात आला आहे. चालू महिन्याखेर अतिरिक्त ३६ हजार टन कांद्याची देशात आयात होणे अपेक्षित आहे. त्यामुळे कांद्याच्या किमती कमी होण्यासाठी मदत होईल, असे पासवान यांनी सांगितले.