महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सुवर्णरोख्यात गुंतवणुकीची या पाच दिवसात मिळणार संधी; जाणून घ्या, अधिक माहिती - Sovereign gold bond scheme details

सार्वभौम सुवर्ण रोखे २०२१-२२ हे पहिल्या टप्प्यात १७ मे ते २१ मेपर्यंत खुले राहणार आहेत. तर रोखे २५ मे रोजी जारी केले जाणार आहेत.

Sovereign gold bond
सुवर्ण रोखे

By

Published : May 13, 2021, 7:13 PM IST

नवी दिल्ली - सार्वभौम सुवर्ण रोखे २०२१-२२ हे सोमवारपासून खरेदीसाठी खुले राहणार आहेत. ग्राहकांना पाच दिवसांसाठी खरेदीची संधी मिळणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. हे सुवर्णरोखे सहा टप्प्यात मे २०२१ ते सप्टेंबर २०२१ पर्यंत खुले राहणार आहेत.

सार्वभौम सुवर्ण रोखे २०२१-२२ हे पहिल्या टप्प्यात १७ मे ते २१ मेपर्यंत खुले राहणार आहेत. तर रोखे २५ मे रोजी जारी केले जाणार आहेत. हे सुवर्णरोखे बँकांमधून (स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँक वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, निवडक पोस्ट ऑफिस, निर्देशित स्टॉक एक्सचेंजमधून विक्री करण्यात येणार आहेत.

हेही वाचा-युट्यूबमधील 'शॉर्ट्स' व्हिडिओकरता 'या' कंपनीचे मिळणार मोफत संगीत

  • केंद्र सरकारच्यावतीने भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुवर्णरोखे जारी करणार आहे.
  • सुवर्णरोख्यांची किंमत भारतीय रुपयात निश्चित करण्यात येते.
  • सुवर्णरोख्यांचा कालावधी ८ वर्षांसाठी आहे. तर ५ वर्षानंतर योजनेमधून बाहेर पडण्याचा गुंतवणूकदारांना पर्याय आहे. मात्र, या गुंतवणूकदारांना सुवर्णरोख्यांवरील व्याज मिळणार नाही.
  • सरकारच्या माहितीनुसार ग्राहकांना वैयक्तिकपणे सुवर्ण रोखे खरेदीतून जास्तीत जास्त ४ किलोपर्यंत सोन्यात गुंतवणूक करता येते. हिंदू अविभक्त ग्रुपला ४ किलो, ट्रस्टला २० किलो सोन्यात सुवर्ण रोख्यामधून गुंतवणूक करता येते.

यामुळे सरकारने सुरू केले होते सुवर्ण रोखे-

भारतीयांचा सोने खरेदीकडे असलेला कल लक्षात घेवून मोदी सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेला २०१५ मध्ये सुरुवात केली होती. योजनेसाठी फक्त भारतीय नागरिक, धर्मादाय संस्था, कंपन्या, ट्रस्ट आदी अर्ज करू शकतात. एक ग्रॅम सोन्यासाठी एक रोख्यात गुंतवणूक करण्यात येते. भौतिक सोन्याची कमी मागणी होण्यासाठी सरकारकडून सुवर्ण रोखे बाजारात आणण्यात आले आहेत.

हेही वाचा-तामिळनाडू : स्टरलाईट कॉपर कंपनीमधून ऑक्सिजनचे उत्पादन सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details