महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

स्मार्टफोनच्या आयातीत दुसऱ्या तिमाहीत 48 टक्क्यांची घसरण - Xiaomi shipment in India

अॅपलने त्यांच्या पुरवठा साखळीत वैविध्य आणण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे फॉक्सकॉन्न आणि विस्ट्रॉन या अॅपलच्या पुरवठादार कंपन्यांनी देशामधील गुंतवणूक वाढविली आहे.

स्मार्टफोन आयात
स्मार्टफोन आयात

By

Published : Aug 3, 2020, 7:09 PM IST

नवी दिल्ली- कोरोना महामारी आणि टाळेबंदीचा देशातील स्मार्टफोनच्या आयातीवर परिणाम झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत स्मार्टफोनच्या आयातीत 48 टक्क्यांची घसरण झाली आहे.

शाओचा स्मार्टफोनच्या बाजारपेठेत 31 टक्के हिस्सा आहे. शाओमीच्या 5.3 दशलक्ष स्मार्टफोनची आयात झाली आहे. विवोच्या 3.7 दशलक्ष स्मार्टफोनची आयात होवून कंपनीने दुसरा क्रमांक गाठला आहे. कंपनीचा देशातील स्मार्टफोनच्या बाजारपेठेतील हिस्सा 19.9 टक्क्यांवरून 21.3 टक्के हिस्सा झाल्याचे कॅनालिज या बाजारपेठ संशोधन करणाऱ्या कंपनीने म्हटले आहे.

स्मार्टफोनच्या बाजारपेठेत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सॅमसंगच्या 2.9 दशलक्ष स्मार्टफोनची आयात झाली आहे. ओपोच्या स्मार्टफोनच्या बाजारपेठेत तिसरा क्रमांक राहिला आहे. कॅनालिसच्या विश्लेषक मधुमित्रा चौधरी यांनी स्मार्टफोन बाजारपेठेला सावरण्याचा रस्ता हा खडकाळ रस्त्याप्रमाणे असल्याचे म्हटले आहे. शाओमी आणि विवो कंपन्यांनी त्यांच्या ऑफलाईन नेटवर्कला मदत होण्यासाठी ऑनलाईन रणनीती आखली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

नव्या नियमामुळे कंपन्यांच्या उत्पादनात घसरण झाली आहे. आयातीत सर्वात कमी परिणाम अॅपलवर झाला आहे. अॅपलने त्यांच्या पुरवठा साखळीत वैविध्य आणण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे फॉक्सकॉन्न आणि विस्ट्रॉन या अॅपलच्या पुरवठादार कंपन्यांनी देशामधील गुंतवणूक वाढविली आहे.

जूनच्या तिमाहीत कमी झालेली मागणी, विस्कळित झालेली पुरवठा साखळी या अडचणींना स्मार्टफोन कंपन्या सामोरे गेल्या आहेत. तसेच स्मार्टफोनची ऑनलाईन व ऑफलाईन विक्रीवर निर्बंध लागू करण्यात आले होते. दुसऱ्या तिमाहीत मागणी वाढली असताना गरजेची पूर्तता करण्यासाठी शाओमी आणि ओप्पोच्या स्मार्टफोनच्या आयात वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details