महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Steps for Financial Health : आर्थिक आरोग्य नियंत्रणात ठेवण्याकरिता 'हे' सहा निर्णय घ्या - decision as per financial capabilities

सामान्यत: आपण आरोग्याची काळजी घेण्याकरिता तपासण्या ( Wealth checkups ) करतो. त्याचप्रमाणे संपत्तीचे आरोग्य वेळोवेळी पाहावे. जेणेकरून आपण आर्थिक उद्दिष्ट ( financial planning ) पूर्ण करण्याच्या दृष्टीने जात आहोत का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

financial health
financial health

By

Published : Jan 4, 2022, 3:35 PM IST

हैदराबाद- शारीरिक आरोग्याप्रमाणेच संपत्तीचे आरोग्य पाहणे महत्त्वाचे ( Wealth checkups ) असल्याचे आर्थिक तज्ज्ञ सांगतात. गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील संधी माहित ( market opportunities ) करून घ्याव्यात. सामान्यत: आपण आरोग्याची काळजी घेण्याकरिता तपासण्या करतो. त्याचप्रमाणे संपत्तीचे आरोग्य वेळोवेळी पाहावे. जेणेकरून आपण आर्थिक उद्दिष्ट ( financial planning ) पूर्ण करण्याच्या दृष्टीने जात आहोत का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

  1. वित्तीय नियोजन ( Financial Planning ) - आपल्याला कोरोनाने अनेक धडे शिकविले आहेत. कोरोनाच्या संकटात अनेक उद्योग बंद झाले. तर अर्थव्यवस्था ढासळल्याने अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. शेअर बाजारातही चढ-उतार पाहायला मिळाले. नवीन वर्षात उद्योगांची भरभराई होईल व व्यवसाय वाढतील अशा पद्धतीने अर्थव्यवस्था स्थिर ( stabilize the economy ) होईल, अशी आपण आशा करू.
  2. तुम्ही उद्दिष्टाच्या दिशेने आहात का?- उद्दिष्टाप्रमाणे गुंतवणूक ( Investing on a targeted basis ) करणे ही नवीन गोष्ट नाही. मल्टीकॅप, फ्लेक्सी कॅप फंड अशा विविध गुंतवणुकीच्या संधी खुल्या असतात. त्यामध्ये कमीत कमी जोखीम असते. याचबरोबर गुंतवणूकदारांनी त्यांची संपत्ती वाढविण्यासाठी इतर गुंतवणुकीचाही विचार करायला हवा.
  3. जोखीमवर आधारित बक्षीस- खरेतर जोखीम म्हणजे तणावाची गोष्ट मानली जाते. मात्र, ज्यांना बाजारामधील स्थिती माहिती असते, त्यांना जोखीम हे बक्षीसाशी कशी जोडली आहे, हे माहित असते. गुंतवणूकदार त्यांच्या गरजेप्रमाणे आणि आर्थिक क्षमतेप्रमाणे ( decision as per financial capabilities ) जोखीम घेऊ शकतात.
  4. गुंतवणुकीच्या काय संधी आहेत ? ( opportunities for investment ) - आक्रमक गुंतवणूकदारांपेक्षा मंदगतीने गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. ते ईटीएफ, इंडेक्स फंड अशामध्ये गुंतवणूक करतात. मात्र, एकाच निर्देशांकामध्ये गुंतवणूक न करता जिथे क्षमता आहे, त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असते.
  5. गुंतवणुकीच्या उद्दिष्टांचे पुनरावलोकन केले आहे का? - गेल्या दोन वर्षांमध्ये नाट्यमय सुधारणा झाल्या आहेत. लोकांच्या गरजा आणि प्राधान्यक्रम हा बदलला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुंतवणुकीचे पुनरावलोकन करणे अधिक फायद्याचे आहे. तुम्ही विवाह करणार असाल किंवा उच्च शिक्षण घेणार असाल तर त्यासाठी आर्थिक बाजू नियंत्रणात ठेवण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. तुमचे उद्दिष्ट आणि भविष्यातील गरजा या प्रमाणे तुम्हाला पोर्टफोलिओ बदलावा लागणार आहे.
  6. देशाच्या बाहेर गुंतवणुकीच्या संधी- भारतीय बाजारात गुंतवणुकीच्या अनेक संधी आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणुकीच्या संधी शोधणे चुकीचे नाही. उलट, जोखीम घेण्यासाठी तुम्हाला अधिक धाडस दाखवावे लागणार आहे.
  7. तुम्ही आपत्कालीन निधीत गुंतवणूक केली आहे का?आयुष्यात काहीच स्थिर नाही. मात्र, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार असायला हवे. जेणेकेरून कोरोनाच्या संकटातही आपण सामान्य जीवन जगण्यास सक्षम राहू. त्यासाठी आपत्कालीन निधीची तरतूद ठेवा.

जर आपण आधीच आर्थिक निर्णय घेतले तर भविष्य उज्जवल असे, अॅक्सिस एएमसीचे चिफ बिझनेस ऑफिसर राजीव अय्यंगार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details