महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोणतेही सकारात्मक चिन्ह नसल्याने शेअर बाजारात पडझड - गुंतवणूकतज्ज्ञांचे मत - Mumbai Share Market today

कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर नवीन कार्यशैली, चीनवरील कमी होणारे अवलंबित्व, नवीन पुरवठा साखळीचा भारत आणि सुधारलेले उत्पादन क्षेत्र दिसून येणार आहे. कोरोनामधून चांगले निष्पन्न होईल, अशी आशा करायला हरकत नसल्याचे पंकज जयस्वाल यांनी सांगितले.

Pankaj Jaiswal
पकंज जयस्वाल

By

Published : Mar 16, 2020, 1:28 PM IST

Updated : Mar 16, 2020, 2:00 PM IST

मुंबई -कोरोनाचा वाढता प्रभाव आणि मंदावलेली आर्थिक स्थिती आहे. अशावेळी कोणतेही सकारात्मक चिन्ह नसल्याने शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण होत असल्याचे गुंतवणूकतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शेअर बाजार गुंतवणूतज्ज्ञ पकंज जयस्वाल म्हणाले, सध्या कोरोनाच्या प्रसाराने आर्थिक मंदी येण्याची भीती आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेने आपतकालीन स्थिती घोषित केली आहे. तर भारतानेही देशात येणाऱ्या विदेशी पर्यटकांना व्हिसा देणे बंद केले आहे. ऑस्ट्रेलियाने कोरोनावर प्रतिबंध करण्यासाठी अशाच उपाययोजना केल्या आहेत. यापूर्वीच चीनने वूहानमधून बाहेर जाण्यासाठी नागरिकांना मनाई केली आहे.

शेअर बाजार गुंतवणूकतज्ज्ञ

हेही वाचा-कोरोनाने जागतिक अर्थव्यवस्था मंदावण्याची भीती: शेअर बाजारात २,१२५ अंशांनी घसरण

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. विविध राज्यांनी कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी गांभीर्याने पावले उचलण्यास सुरुवात केली. याचा अर्थ कोरोनाने गंभीर स्थिती झाली आहे. त्याचा शेअर बाजारावर परिणाम होणे, साहजिक आहे. शुक्रवारी शेअर बाजार घसरण असताना काहीजणांनी खरेदी केल्याने शेअर बाजार वधारला होता. त्यांच्यावर सरकारची करडी नजर राहणार आहे.

हेही वाचा-महामारीचा आर्थिक फटका : गुंतवणूकदारांनी गमाविले ६.२५ लाख कोटी!

कारचा वेग कमी झाला तर प्रवास बंद झाल्याची स्थिती होते. सर्वच थांबले तर आपणही थांबणार आहोत. विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत आघाडीवर आहे. त्यामुळे आपल्यावर त्याचा परिणाम जाणवणार आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर नवीन कार्यशैली, चीनवरील कमी होणारे अवलंबित्व, नवीन पुरवठा साखळीचा भारत आणि सुधारलेले उत्पादन क्षेत्र दिसून येणार आहे. कोरोनामधून चांगले निष्पन्न होईल, अशी आशा करायला हरकत नसल्याचे पंकज जयस्वाल यांनी सांगितले.

मुंबई शेअर बाजारात सकाळच्या सत्रात २,१२५ अंशांनी घसरण झाली होती. तर शेअर बाजार गुंतवणूकदारांनी ६.२५ लाख कोटी रुपये गमाविले आहेत.

Last Updated : Mar 16, 2020, 2:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details