महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धसका ; शेअर बाजारात ९०० अंशांची पडझड - Share market live news

कोरोनाबाधितांचे प्रमाण भारतासह जगभरात वाढत चालले आहेत. त्यामुळे जगभरातील गुंतवणुकदारांची चिंता वाढत चालल्याचे बाजार विश्लेषकांनी म्हटले आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर होत आहे.

Mumbai Share Market
मुंबई शेअर बाजार

By

Published : Mar 25, 2021, 2:53 PM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांकात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दुपारी १ वाजून २० मिनिटाला ८०९.७८ अंशाने घसरून ४९,१८०.३१ वर पोहोचला आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसभरात जास्तीत जास्त ९४४ अंशाने घसरून ४८,२३६.३५ वर पोहोचला होता. निफ्टीचा निर्देशांक २५४.८५ अंशाने घसरून १४,२९४.५५ वर पोहोचला. कोरोनाबाधितांचे प्रमाण भारतासह जगभरात वाढत चालले आहेत. त्यामुळे जगभरातील गुंतवणुकदारांची चिंता वाढत चालल्याचे बाजार विश्लेषकांनी म्हटले आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर होत आहे.

हेही वाचा-शेअर बाजाराच्या पडझडीने गुंतवणुकदारांचे ३.२७ लाख कोटींचे नुकसान

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-

रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस या मोठ्या कंपन्यांचे शेअर घसरले आहेत. बँकिंग, फायनान्स, ऑटो आणि दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर घसरले आहेत. मागील सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ४९,१८०.३१ वर स्थिरावला होता.

हेही वाचा-कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने वाढली चिंता; शेअर बाजार निर्देशांकात ८७१ अंशांची पडझड

शेअर बाजार गुंतवणुकदारांच्या संपत्तीत बुधवारी ३.२७ लाख कोटींची घट

शेअर बाजार निर्देशांकातील घसरणीचा गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे. शेअर बाजार गुंतवणुकदारांच्या संपत्तीत बुधवारी ३.२७ लाख कोटींची घट झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ८७१.१३ अंशाने घसरून ४९,१८०.३१ वर स्थिरावला. या घसरणीनंतर शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य हे ३,२७,९६७.७१ कोटी रुपयांवरून २,०२,४८,०९४.१९ कोटी रुपये झाले होते.

जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले की, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने शेअर बाजार अस्थिर राहिला आहे. जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीचाही शेअर बाजारावर परिणाम झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details