महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पाच सत्रात शेअर बाजार निर्देशांकात २,४१० अंशांची घसरण; ही आहेत चार कारणे - Weak global cues

कोरोनाची वाढती संख्या, जागतिक बाजारात नकारात्मक स्थिती आदी कारणांमुळे गेल्या पाच सत्रात शेअर बाजारात घसरण सुरू आहे.

शेअर बाजार
शेअर बाजार

By

Published : Feb 22, 2021, 9:07 PM IST

बिझनेस डेस्क, ईटीव्ही भारत- गेल्या पाच सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकात २,४१० अंशांची घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने ५२,००० चा टप्पा ओलांडल्यानंतर शेअर बाजार निर्देशांकात घसरण सुरू झालेली दिसून आली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १,१४५ अंशाने घसरला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक ३०६ अंशाने घसरला आहे.

ही आहेत शेअर बाजार निर्देशांक घसरण्याची कारणे

हेही वाचा-शेअर बाजारातील घसरणीचा फटका; गुंतवणुकदारांनी गमाविले ३.७ लाख कोटी

  1. कोरोनाची वाढती संख्या- कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने शेअर बाजार गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले आहे. विशेषत: महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रविवारी भारतात कोरोनाबाधितांची संख्या १.१ कोटीवर पोहोचली आहे. तर मृत्युंचे प्रमाण हे १.५६ लाख आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत टाळेबंदीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
  2. जागतिक बाजारात नकारात्मक स्थिती- पश्चिम युरोपातील शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली आहे. त्यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची भीती आहे.
  3. नफा नोंदविणे- शेअर बाजार विश्लेषकांच्या माहितीनुसार शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला आहे. गुंतणुकदारांनी आर्थिक आकडेवारी येण्यापूर्वी नफा नोंदविण्याकडे लक्ष दिले आहे. सरकारी आकडेवारीनुसार देशाची अर्थव्यवस्था तांत्रिकदृष्ट्या मंदीत पोहोचली आहे. गतवर्षी एप्रिल ते जुनदरम्यान २३.९ टक्के तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान ७.५ टक्के जीडीपीत घसरण झाली आहे.
  4. व्यवहारांमध्ये बदल -दलालांच्या माहितीनुसार गुंतवणुकदारांनी लार्ज कॅप शेअर बाजारामधून मीड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामागे नफा अधिक कमविणे हा उद्देश आहे.

हेही वाचा-संगमनेरच्या ग्रुपकडून करचुकवेगिरीचा संशय; आयटी विभागाचे राज्यात ३४ मालमत्तांवर छापे

ABOUT THE AUTHOR

...view details