महाराष्ट्र

maharashtra

शेअर बाजार निर्देशांकात ४५० अंशांनी घसरण; कोरोनाच्या प्रसाराचा परिणाम

By

Published : Feb 24, 2020, 12:18 PM IST

मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांकात ४९७ अंशांनी घसरण झाली आहे. त्यानंतर शेअर बाजार ४१०.१२ अंशांनी घसरून ४०,७६० वर पोहोचला होता. तर निफ्टीचा निर्देशांक १३५.८५ अंशांनी घसरून ११,९४५ वर पोहोचला.

मुंबई - शेअर बाजार निर्देशांकात सकाळच्या सत्रात ४५० अंशांनी घसरण झाली आहे. आर्थिक महासत्ता असलेल्या चीनमधील कोरोना विषाणुचा प्रसार वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे.

मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांकात ४९७ अंशांनी घसरण झाली आहे. त्यानंतर शेअर बाजार ४१०.१२ अंशांनी घसरून ४०,७६० वर पोहोचला होता. तर निफ्टीचा निर्देशांक १३५.८५ अंशांनी घसरून ११,९४५ वर पोहोचला.

हेही वाचा-जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची पाचव्या स्थानावर झेप; युके, फ्रान्सला टाकले मागे

मुंबई शेअर बाजार गुरुवारी १५२.८८ अंशांनी घसरून ४१,१७०.१२ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ४५.०५ अंशांनी घसरून १२,०८०.८५ वर स्थिरावला होता. संसर्गजन्य कोरोनाने जागतिक अर्थव्यवस्थेची जोखीम वाढणार असल्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) इशारा दिला आहे. सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत १९ पैशांनी घसरून रुपया ७१.८३ वर पोहोचला.

हेही वाचा-लग्नसराईने सोन्याचा वाढला 'भाव'; आजपर्यंतचा विक्रमी उच्चांक

ABOUT THE AUTHOR

...view details