महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दोनच दिवसात शेअर बाजारात ४०० अंशाची पडझड - मुंबई शेअर बाजार

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर  मुख्यत: ग्लोबल शेअरची विक्री झाल्याने शेअर बाजाराचे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मुंबई शेअर बाजार

By

Published : Jul 8, 2019, 12:14 PM IST

मुंबई - एचडीएफसी ट्विन्स, एल अँड टी आणि रिलायन्सच्या शेअरमध्ये सकाळच्या सत्रात घसरण झाली. त्याचा फटका बसल्याने मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ४०० अंशाची घसरण झाली.

सकाळी साडेनऊ वाजता शेअर बाजार निर्देशांक ४०५.६७ अंशाने घसरून ३९,१०७.०२ वर पोहोचला. तर निफ्टी निर्देशांकात १२८ अशांची घसरण होऊन ११,६८३.१५ वर पोहोचला.

या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले -

हिरो मोटोकॉर्प, एल अँड टी, मारुती, बजाज ऑटो, एम अँड एम, टाटा मोटर्स आणि एचयूएल या कंपन्यांचे शेअर ३.४४ टक्क्यापर्यंत घसरले. येस बँक, एचसीएल टेक, सन फार्मा, इन्फोसिस, आयटीसी, वेदांत आणि पॉवरग्रीड कंपन्यांचे शेअर ६ टक्क्यापर्यंत वधारले आहेत.

विदेशी गुंतवणुकदार संस्थांनी शुक्रवारी ८९.३८ कोटींच्या शेअरची विक्री केली. तर देशातील वित्तीय संस्थांनी २७५.६३ कोटींच्या शेअरची खरेदी केली. ही माहिती शेअर बाजाराकडील माहितीवरून दिसून आली. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यत: ग्लोबल शेअरची विक्री झाल्याने शेअर बाजाराचे नुकसान झाल्याने व्यापाऱ्याने सांगितले. डॉलरच्या तुलनेत १५ पैशांनी घसरून रुपया ६८.५७ वर पोहोचला.

ABOUT THE AUTHOR

...view details