मुंबई- शेअर बाजार खुला होतानाच निर्देशांक ४०० अंशांनी घसरला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी ट्विन्स आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर घसरले आहेत.
शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ३९३.०३ अंशांनी घसरला. त्यानंतर शेअर बाजार २०१.९४ अंशांनी घसरून ४०,०७९.२६ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक ५८.१० अंशांनी घसरून ११,७३९ वर पोहोचला.
हेही वाचा-सोने प्रति तोळा होवू शकते ४७,००० हजार रुपये - मोतीलाल ओसवाल
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
सन फार्मा, भारती एअरटेल, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसीचे शेअर २ टक्क्यापर्यंत घसरले. एचयूएल, नेस्ले इंडिया, पॉवरग्रीड आणि एशियन पेंट्सचे शेअर वधारले आहेत. मागील सत्रात शेअर बाजार निर्देशांक ८२.०३ अंशांनी घसरून ४०,२८१.२० वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ३१.५० अंशांनी घसरून ११,७९७.९० वर स्थिरावला होता.
हेही वाचा-अमेरिकेतील व्यापारावरील नियमन कमी करणार; ट्रम्प यांचे भारतीय सीईओंना आश्वासन
कोरोनाचा चीनमधून इतर देशांमध्ये संसर्ग पसरत चालला आहे. त्यामुळे जागतिक गुंतवणुकदारांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. जागतिक आर्थिक मंचावरील निराशादायक स्थिती आणि विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी बाजारातून काढलेला निधी या कारणांनी शेअर बाजार घसरला आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी २,३१५.०७ कोटी रुपयांच्या शेअरची बुधवारी विक्री केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी १,५६५.२८ कोटी रुपयांच्या शेअरची बुधवारी खरेदी केली.