महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सलग चौथ्या सत्रात शेअर बाजारात घसरण; सन फार्माला सर्वाधिक फटका - Share Market today

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३९२ अंशांनी घसरून ३९,८८८.९६ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांकही ११९.४० अंशांनी घसरून ११,६७८.५० वर पोहोचला.

Mumbai Share Market
मुंबई शेअर बाजार

By

Published : Feb 26, 2020, 5:04 PM IST

मुंबई- सलग चौथ्या सत्रात मुंबई शेअर बाजारात घसरण झाली आहे. कोरोनाची व्याप्ती जगभरात वाढत असल्याने जागतिक अर्थव्यवस्थेच्या वृद्धीदरावर परिणाम होण्याची भीती आहे. या भीतीने मुंबई शेअर बाजार निर्देशांकात ३९२ अंशांनी घसरण झाली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३९२ अंशांनी घसरून ३९,८८८.९६ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांकही ११९.४० अंशांनी घसरून ११,६७८.५० वर पोहोचला.

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

सन फार्माचे सर्वाधिक शेअर घसरले आहेत. त्यापाठोपाठ मारुती, एल अँड टी, हिरो मोटोकॉर्प, इन्फोसिस, ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर घसरले आहेत.

तर एसबीआय, एचयूएल, एचसीएल टेक, एशियन पेंट्स आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर वधारले आहेत.

हेही वाचा-क्रिकेटपटू कोहलीच्या 'विराट' ब्रँडने पुमा इंडियाचा स्पोर्ट्सवेअर व्यवसायात षटकार!

जगभरातील शेअर बाजारात घसरण-

शांघाय, टोकिया, सेऊल आणि हाँगकाँगच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. युरोपच्या शेअर बाजारातही सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. अमेरिकेत कोराना पसरण्यापूर्वी अमेरिकन आरोग्य यंत्रणेने तयार राहण्याची मंगळवारी गरज व्यक्त केली. त्यानंतर आज वॉल स्ट्रीटच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

हेही वाचा-कोरोनाची 'महामारी' झाल्यास जागतिक मंदीचे अरिष्ट येण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details