मुंबई - शेअर बाजार निर्देशांक ६४५ अंशाने वधारून ३८,१७७.९५ वर बंद झाला. बँका, वित्तीय कंपन्या तसेच धातुंचे शेअर वधारल्याने शेअर बाजारात आज तेजी दिसून आली.
शेअर बाजाराच्या सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा घेतला. मात्र, दुपारनंतर शेअर बाजार निर्देशांक ६४५ अंशाने वधारून ३८,१७७.९५ वर बंद झाला. तर निफ्टीही १८६.९० अंशाने वधारून ११,३१३.३० वर पोहोचला होता.
हेही वाचा-सरकारची दिवाळी भेट : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
मुंबई शेअर बाजारात इंडसइंड बँकेचे सर्वात अधिक ५.४५ टक्क्यांनी शेअर वधारले. त्या पाठोपाठ भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एम अँड एम, कोटक बँक, टाटा स्टील आणि एचडीएफसी बँकेचे शेअर वधारले.
हेही वाचा-'मंदावलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेचे भारतात दिसणार स्पष्ट परिणाम'
येस बँकेच्या शेअरमध्ये सर्वात अधिक ५.२६ टक्क्यांची घसरण झाली. हिरो मोटोकॉर्प, एचसीएल टेक, आयटीसी, टीसीएस, इन्फोसिस, ओएनजीसी आणि बजाज ऑटोचे शेअर २.६५ टक्क्यांनी घसरले.