मुंबई- शेअर बाजार खुला होताना ३०० हून अधिक अंशांनी वधारला आहे. आयटीसी, एचडीएफसी ट्विन्स आणि एचयूएल कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.
शेअर बाजारात सकाळच्या सत्रात २१७.६९ अंशांनी वधारून ३०,५२४.५३ वर पोहोचला आहे. निफ्टीचा निर्देशांक ५७.७० अंशांनी वधारून ८,९३६.८० वर पोहोचला आहे.
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
आयटीसीचे शेअर सर्वाधिक ३ टक्क्यांनी वधारले आहेत. एल अँड टी, टाटा स्टील, एनटीपीसी, एचयूएल, पॉवरग्रीड, एचडीएफसी ट्विन्स आणि अल्ट्राटेक सिंमेटचे शेअर वधारले आहेत. दुसरीकडे हिरोमोटोकॉर्प, इंडुसइंड बँक, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स आणि एसबीआयचे शेअर घसरले आहेत. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफपीआय) मंगळवारी १,३२८.३१ कोटी रुपयांचे शेअर विकले आहेत.