मुंबई -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतानाच शेअर बाजाराने अनुकूल प्रतिसाद दिला आहे. शेअर बाजारात १ हजार अंशाने उसळी घेतली आहे. तर अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेअर बाजाराचा निर्देशांक १५०० अंशाने वधारला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ९२९.५४ अंशाने वधारून ४७,१२५.३१ अशांवर वधारला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक २६०.०५ अंशाने वधारून १३,८९४.६५ वर स्थिरावला.
शेअर बाजारात इंडसइंड बँकेचे सर्वाधिक शेअर वधारले आहेत. आयसीआयसीय बँक, एचडीएफसी, बजाज फिन्सर्व्ह, एम अँड एम आणि एसबीआयचे शेअर वधारले आहेत. तर डॉ. रेड्डीज, टेक महिंद्रा, टीसीएस आणि एचसीएल टेकचे शेअर घसरले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी भांडवली खर्चात ३४.५ टक्क्यांनी वाढ करून ५.४ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याची जाहीर केले आहे. तसेच सार्वजनिक बँकांसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात सकारात्मक चित्र राहिले आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४८३ अंशाने वधारला आहे. बाजार खुला होताना निर्देशांक ४४३ अंशाने वधारून ४६,७२८.८३ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ११४.८५ अंशाने वधारून १३,७४९.४५ वर स्थिरावला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक खुला होताना इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, टायटन आणि एचडीएफसीचे बँक शेअर वधारले आहेत. मागील सहा सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३,५०६.३५ अंशाने घसरला. तर निफ्टीचा निर्देशांक १,०१०.१० अंशाने घसरला.