मुंबई - भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटने पुन्हा एकदा 58 हजारांचा पल्ला गाठला आहे. आज सकाळच्या सत्रात मार्केट सुरु होताच 260 अंकांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे सेन्सेक्स 58,390.21 वर पोहचला आहे. तर निफ्टीत 75 अंकांची वाढ पाहायला मिळाली. यामुळे निफ्टी 17,399.35 अंकांवर पोहोचलाय.
सुरुवातीला 30 शेअर असलेला सेन्सेक्स 260.26 अंकांनी किंवा 0.45 टक्क्यांनी 58,390.21 वर आणि निफ्टी 75.75 अंक किंवा 0.44 टक्क्यांनी 17,399.35 वर होता.
सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज अवघ्या दोन टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर होती. तसेच बजाज ऑटो, एल अँड टी, एचयूएल, एम अँड एम, डॉ रेड्डीज आणि बजाज फिनसर्वचे शेअर्सही वाढले. दुसरीकडे, एशियन पेंट्स, टीसीएस, पॉवर ग्रिड, टायटन आणि टेक महिंद्राचे नुकसान झाले.
मागील सत्रात 30 शेअर्सचा सेन्सेक्स 277.41 अंक किंवा 0.48 टक्क्यांनी वाढून 58,129.95 वर बंद झाला होता. तर निफ्टी 89.45 अंक किंवा 0.52 टक्क्यांनी वाढून 17,323.60 वर पोहचला होता. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 1.20 टक्क्यांनी घसरून 71.74 डॉलर प्रति बॅरलवर आले.