महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजाराची १,४११ अंशांनी उसळी; आर्थिक पॅकेज जाहीर झाल्याचा परिणाम - निफ्टी

इंडसइंड बँकेचे सर्वाधिक ४६ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. तर भारती एअरटेल, एल अँड टी, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा, बजाज ऑटो, एचयूएल आणि एचडीएफसीचे शेअर १० टक्क्यापर्यंत वधारले आहेत.

शेअर बाजार
शेअर बाजार

By

Published : Mar 26, 2020, 5:06 PM IST

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १.७० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केल्याचा शेअर बाजारात सकारात्मक परिणाम झाला. मुंबई शेअर बाजार निर्देशांक १,४९०.९९ अंशांनी उसळी घेत २९,९४६.७७ वर स्थिरावला.

निफ्टीचा निर्देशांक ३२३.६० अंशांनी वधारून ८,६४१.४५ वर स्थिरावला.

हेही वाचा-कोरोनाचे सावट : गुढीपाडव्यापूर्वी देशातील बहुतांश सोन्याचे दुकाने बंद

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

इंडसइंड बँकेचे सर्वाधिक ४६ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. तर भारती एअरटेल, एल अँड टी, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा, बजाज ऑटो, एचयूएल आणि एचडीएफसीचे शेअर १० टक्क्यापर्यंत वधारले आहेत. तर मारुती सुझुकी, टेक महिंद्रा, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर घसरले आहेत. कोरोनाचे देशात रुग्ण वाढल्याने गेली काही दिवस शेअर बाजारात घसरण होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना देशाच्या अर्थव्यवस्थेचा परिणाम होण्याची भीती आहे. मात्र, केंद्र सरकारने १.७० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केल्याने शेअर बाजार गुंतवणूकदार काहीसे निश्चिंत झाले.

हेही वाचा-सॅनिटायझरसह सर्व प्रकारच्या व्हेटिंलेटरच्या निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी

ABOUT THE AUTHOR

...view details