महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मुंबई शेअर बाजार निर्देशांकांत १४८.८२ अंशांची घसरण; 'हे' आहे कारण

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आशिया-पॅसिफिकचा विकासदर चालू आर्थिक वर्षात उणे २.२ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचा शेअर बाजारात परिणाम झाल्याचे आनंद राठी इक्विटी रिसर्चचे प्रमुख नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार

By

Published : Oct 22, 2020, 6:06 PM IST

मुंबई - शेअर बाजारात सलग चार दिवस सुरू असलेल्या तेजीला आज ब्रेक लागला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १४८.८२ अंशाने घसरून ४०,५५८.४९ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ४१.२९ अंशाने घसरून ११,८९६.४५ वर स्थिरावला.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आशिया-पॅसिफिकचा विकासदर चालू आर्थिक वर्षात उणे २.२ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचा शेअर बाजारात परिणाम झाल्याचे आनंद राठी इक्विटी रिसर्चचे प्रमुख नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले.

या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर-

इंडसइंड बँकेचे शेअर सर्वाधिक ३ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक, टायटन, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, नेस्ले इंडिया, सन फार्मा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर घसरले आहेत. एनटीपीसी, भारती एअरटेल, बजाज फायनान्स आणि अॅक्सिस बँकेचे शेअर वधारले.

शांघाय, टोकियो, सेऊलच्या शेअर बाजारातही घसरण झाली आहे. तर हाँगकाँगचा शेअर बाजार वधारला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ०.२२ टक्क्यांनी घसरून ४१.८२ डॉलर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details