मुंबई - मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकार पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. या शक्यतेमुळे सकाळच्या सत्रात शेअर बाजार निर्देशांक वधारला. त्यानंतर १०० अंशाची घसरण झाली.
शेअर बाजार निर्देशांकात १०० अंशाची घसरण - Sensex
शेअर बाजार सकाळी १० वाजून २८ मिनिटाला १०४.३६ अंशाने घसरून ३७,२९८.१३ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक हा ४८.०५ अंशाने घसरून ११,००५.८५ वर पोहोचला.
शेअर बाजार सकाळी १० वाजून २८ मिनिटाला १०४.३६ अंशाने घसरून ३७,२९८.१३ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक हा ४८.०५ अंशाने घसरून ११,००५.८५ वर पोहोचला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ३०५ कोटींचे शेअर विकले आहेत. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ३८६ कोटींच्या शेअरची खरेदी केली आहे.
केंद्र सरकार पॅकेज जाहीर करण्याची शक्यता-
वाहन उद्योगामधील मंदी व रोजगार निर्मितीचे घटलेले प्रमाण यामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचे चित्र अधिकच गडद होत आहे. अशा स्थितीमध्ये केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. नेमेकी काय पावले उचलण्यात यावीत, यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी व पंतप्रधान कार्यालयामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतेच बैठक झाली आहे.