मुंबई- शेअर बाजार बंद होताना निर्देशांक ८३९.९९ अंशांनी घसरून ३७,५७६.६२ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक २७९.५५ अंशांनी घसरून १०,९८९.४५ वर स्थिरावला. शेअर बाजारातील पडझडीनंतर गुंतवणूकदारांचे सुमारे ३.८५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांक १,४५९.५२ अंशांनी घसरला. कोरोनाने अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि येस बँकेवरील आर्थिक संकटाने शेअर बाजारात पडझड झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर गुरुवारी निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे येस बँकेच्या ठेवीदारांना जास्तीत जास्त ५० हजार रुपये खात्यामधून काढता येणार आहेत.