मुंबई -आठवड्याच्या चौथ्या दिवशी आज शेअर बाजारात मोठी घसरण ( Share market update on 6th Jan 2022 ) पाहायला मिळाली. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे गुंतवणुकदारांमध्ये वाढलेल्या चिंतेचा शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. बाजार सुरू होताच 713 अंशांनी कोसळला. तर दिवसाखेर शेअर बाजार निर्देशांकात 621 अंशांनी घसरण झाली.
देशभरातून येणारे मंदीचे संकेत आणि राज्यासह देशात वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रसारामुळे शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला ( corona fear impact on share market ) आहे. आठवड्याच्या चौथ्या दिवशी आज बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजारात 713 अंशांची घसरण सेन्सेक्समध्ये पाहायला मिळाली. तर राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच निफ्टीमध्येही 216 अंशांची घसरण पाहायला ( NIFTY update on 6th Jan 2022 ) मिळाली. त्यामुळे निफ्टीही सकाळच्या सत्रात 17,608 निर्देशांकांवर पोहोचला.
हेही वाचा-125 Passengers Covid Positive in Amritsar : इटलीहून आलेल्या विमानात 179 पैकी 125 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह
सर्वच क्षेत्रनिहाय निर्देशांकात घसरण
सर्वच क्षेत्रनिहाय निर्देशांकात घसरण पाहायला मिळाली. यामध्ये आयटी बँक, ऑटो फायनान्स सर्व्हिस, मीडिया, मेटल फार्मा, सरकारी आणि खासगी बँका यांचा ( Share market impact on IT sector ) समावेश आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचा शेअर बाजारावर त्वरित परिणाम दिसून आला. यामुळे बाजार सुरू होताच त्यामध्ये मोठी घसरण झाली. शेअर बाजाराचा निर्देशांक 60 हजार अंशांच्या खाली पोहोचला.