मुंबई- सलग चौथ्या दिवशी शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ६५० अंशाने वधारून ३९,६२३.७६ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक हा १५९.०५ अंशाने वधारून ११,६६२.४० वर स्थिरावला आहे.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक ६०० अंशाने वधारला; निफ्टी पोहोचला ११,६५० जवळ - Bombay stock exchange news
मुंबई शेअर बाजारात एचडीएफसीचे शेअर ८ टक्क्यांहून वधारले आहेत. यामध्ये इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, अल्ट्राट्रेक सिमेंटचा समावेश आहे.
मुंबई शेअर बाजारात एचडीएफसीचे शेअर ८ टक्क्यांहून वधारले आहेत. यामध्ये इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, अल्ट्राट्रेक सिमेंटचा समावेश आहे. तर टाटा स्टील, नेस्ले, लार्सन अँड टुर्बो, सन फार्मा, एनटीपीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर घसरले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोरोनावरील उपचार घेऊन झाले आहेत. त्यानंतर आशियामधील शेअर बाजारात सातत्याने निर्देशांक वधारत आहे. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी २३६.७१ कोटी रुपयांच्या शेअरची सोमवारी खरेदी केली आहे. फॉरेक्स बाजारात १७ पैशांनी घसरून रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ७३.४६ रुपये आहे.