मुंबई- आठवड्याच्या प्रारंभीच शेअर बाजाराचा निर्देशांक १५० अंशाने घसरला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि टाटा स्टीलचे शेअर घसरल्याने शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात १७३.४७ अंशाने घसरून ४०,५१२.०३ वर होता. तर निफ्टीचा निर्देशांक ४७.२० अंशाने घसरून ११,८८३.१५ वर होता.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-
रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर २ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यापाठोपाठ टाटा स्टील, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, आयसीआयसी बँक आणि बजाज फिन्सर्वचे शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया, पॉवरग्रीड आणि एल अँड टीचे शेअर वधारले आहेत.
शेअर बाजाराचे याकडे असणार लक्ष-
चालू वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीतील आर्थिक कामगिरीची आकडेवारी ही कॉर्पोरेट कंपन्यांकडून जाहीर होणार आहे. तसचे पायाभूत उत्पादन क्षेत्राची आकडेवारीही जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराचे या आकेडवारीवर लक्ष असणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर १.६४ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ४१.३८ डॉलर आहेत.
मागील सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक १२७.०१ अंशाने वधारून ४०,६८५.५० वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ३३९.९० अंशाने वधारून ११,९३०.३५ वर स्थिरावला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ९०६.९३ कोटी रुपयांचे शेअर शुक्रवारी खरेदी केले होते.