मुंबई -शेअर बाजाराचा निर्देशांक १७२.६१ अंशाने घसरून ३९,७४९.८५ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ५८.८० अंशाने घसरून ११,६७०.८० वर स्थिरावला.
आज दुपारनंतर शेअर बाजारात धातू, वाहन, स्थावर मालमत्ता आणि वित्तीय संस्थांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ३.१५ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ३८.३९ बॅरल झाले आहेत.