महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

मुंबई शेअर बाजारात दिवसाखेर 155 अंशांची घसरण; औषधी कंपन्यांचे शेअर तेजीत - शेअर बाजार निर्देशांक न्यूज

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 154.89 अंशाने घसरून 49,591.32 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक 38.95 अंशाने घसरून 14,834.85 वर स्थिरावला.

Sensex sheds 155 pts
मुंबई शेअर बाजार

By

Published : Apr 9, 2021, 6:57 PM IST

मुंबई -शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 155 अंशाने घसरला आहे. आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि मोठ्या कंपन्यांचे शेअर घसरले आहेत. जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीने शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर 154.89 अंशाने घसरून 49,591.32 वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक 38.95 अंशाने घसरून 14,834.85 वर स्थिरावला.

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

बजाज फायनान्सचे सर्वाधिक सुमारे 3 टक्क्यांनी शेअर घसरले आहेत. त्यापाठोपाठ अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी आणि एचडीएफसी बँकेचे शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे सन फार्मा, एचयूएल, टेक महिंद्रा आणि डॉ. रेड्डीज कंपनीचे शेअर वधारले आहेत.

हेही वाचा-कोरोनाच्या चाचणीकरता जॉन्सन अँड जॉन्सनची भारत सरकारबरोबर चर्चा सुरू

शेअर बाजारात शेअर विक्रीचा मोठा दबाव दिसून आला आहे. आशियातील शेअर बाजारातील नकारात्मक स्थिती आणि देशभरात कोरोनाचा वाढता संसर्ग या कारणांनी शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाल्याचे रिलायन्स सिक्युरिटीजचे मुख्य रणनीतीकार विनोद मोदी यांनी सांगितले.

हेही वाचा-सहाराचे चेअरमन सुब्रता रॉय यांना कोरोनाची लागण

वित्तीय कंपन्यांचे शेअर घसरले असले तरी औषधी कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने औषधी कंपन्यांच्या विक्रीत वाढ होईल, या अपेक्षेने औषधी कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. विनोद मोदी म्हणाले की, देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. रुपयाचे मूल्य हे डॉलरच्या तुलनेत घसरत असल्यानेही गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 0.27 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 63.03 डॉलर आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details