महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक १५० अंशाने वधारला; उर्जासह बँकिंग शेअरच्या तेजीचा परिणाम - बँकिंग शेअर

अमेरिका-चीनमधील व्यापारी वाद मिटण्याची चिन्हे असल्याचे सँक्टम वेल्थ मॅनेजमेंटचे मुख्य गुंतवणूकदार सुनिल शर्मा यांनी सांगितले. त्यामुळे शेअर बाजारात सकारात्मक चित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संग्रहित - मुंबई शेअर बाजार

By

Published : Oct 16, 2019, 1:07 PM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात १५०.४१ अंशाने वधारून ३८,६६४.५० वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक हा ५०.७५ अंशाने वधारून ११,४७९.०५ वर पोहोचला. बँकिंगसह उर्जा कंपन्यांचे शेअर वधारल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे.

बजाज फायनान्स, येस बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, टाटा स्टील आणि ओएनजीसीचे शेअर वधारले. तर वेदांत, पॉवरग्रीड, आयटीसी, हिरो मोटोकॉर्प, एम अँड एम, एशियन पेंट्स, एल अँड टी आणि टीसीएसचे शेअर १.५० टक्क्यापर्यंत घसरले.

मागील सत्रात शेअर बाजार निर्देशांक हा २९१.६२ अंशाने वधारून ३८,५०६.०९ वर पोहोचला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मंगळवारी ४३६.०२ कोटींची शेअर खरेदी केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ९२९.३९ कोटींच्या शेअरची खरेदी केली. अमेरिका-चीनमधील व्यापारी वाद मिटण्याची चिन्हे असल्याचे सँक्टम वेल्थ मॅनेजमेंटचे मुख्य गुंतवणूकदार सुनिल शर्मा यांनी सांगितले. त्यामुळे शेअर बाजारात सकारात्मक चित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details