मुंबई- सलग नवव्या सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ११९ अंशाची वाढ होऊन निर्देशांक ३८, ५०६ वर जाऊन पोहोचला. बँकिग, धातू आणि ऑटोच्या शेअरची विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी चांगली खरेदी केली आहे.
शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात ११९ अंशाची वाढ - मुंबई शेअर बाजार
अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर' जैसे थे'ठेवले आहेत. त्यानंतर आशियातील शेअर बाजारात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी सावधगिरीची पवित्रा घेतला आहे.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर ' जैसे थे' ठेवले आहेत. त्यानंतर आशियातील शेअर बाजारात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी सावधगिरीची पवित्रा घेतला आहे. शेअर बाजाराच्या निर्देशांकात ०.३१ टक्के वाढ होऊन निर्देशांक ३८, ५०६ वर जाऊन पोहोचला. निफ्टीच्या निर्देशांकात ३६.३५ अंशाची वाढ होऊन निर्देशांक ११,५५७ वर पोहोचला. भारती एअरटेल, एल अँड टी, येस बँक, टाटा स्टील, एनपीटीसी, एशियन पेंट, बजाज ऑटो, एचडीएफसी, अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर ३.०३ टक्क्याने वधारले आहेत. तर आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, एम अँड एम, टीसीएस, ओएनजीसीच्या शेअरमध्ये १.७५ टक्के घसरण झाल्याचे दिसून आले.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांची गुंतवणूक आणि किरकोळ शेअरची खरेदी याचा बाजारपेठेवर प्रभाव दिसून आला आहे. विदेशी गुंतवणुकदार संस्थांनी १ हजार ७७१.६१ कोटींची शेअरची बुधवारी खरेदी केली होती.
Conclusion: