महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सलग चौथ्या दिवशी तेजी; मुंबई शेअर बाजार निर्देशांक 163 अंशांनी वधारला - मुंबई शेअर बाजार अपडेट

मुंबई शेअर बाजारात पॉवरग्रीडचे शेअर सर्वाधिक ४ टक्क्यांनी वधारले आहेत.

मुंबई शेअर मार्केट
मुंबई शेअर मार्केट

By

Published : Oct 21, 2020, 4:26 PM IST

मुंबई- सलग चौथ्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक वाढला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 162.94 अंशांनी वाढून 40,707.31 अंशाच्या पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 40.90 अंकांच्या वाढीसह 11937.70 च्या पातळीवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजारात एचडीएफसी ट्विन्स आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर वधारले. पॉवरग्रीडचे शेअर सर्वाधिक ४ टक्क्यांनी वधारले आहेत. त्यानंतर भारती एअरटेल, टाटा स्टील, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि कोटक बँकेचे शेअर वधारले आहेत. तर टीसीएस, नेस्ले इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेकचे शेअर घसरले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details